Headlines

220 कोटींचा चित्रपट, खोट्या मिशीमुळे झाला फ्लॉप?; 4 वर्षांनंतर सुपरस्टारने मागितली माफी

220 कोटींचा चित्रपट, खोट्या मिशीमुळे झाला फ्लॉप?; 4 वर्षांनंतर सुपरस्टारने मागितली माफी
220 कोटींचा चित्रपट, खोट्या मिशीमुळे झाला फ्लॉप?; 4 वर्षांनंतर सुपरस्टारने मागितली माफी


एखाद्या चित्रपटावर खूप मोठा बजेट खर्च केला जातो, त्यात सुपरस्टारला कास्ट केलं जातं. ऐतिहासिक कथानक आणि भव्यता दाखवून तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल, अशी अपेक्षा केली जाते. परंतु ऐतिहासिक कथानक साकारताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं नाही तर चांगलंच महागात पडू शकतं, याचा विचार निर्मात्यांकडून खूप उशिरा केला जातो. असाच एक चित्रपट चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तब्बल 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात हिरोने खोटी मिशी लावली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता. कारण हिरोने साकारलेली भूमिका ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची होती. आता चार वर्षांनंतर अभिनेत्याने या चुकीसाठी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्याचं नाव आहे ‘सम्राट पृथ्वीराज’. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती.

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या चित्रपटात अक्षयने खोटी मिशी लावल्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी त्याला मिशी वाढवण्याची गरज होती. परंतु ते शक्य न झाल्याने त्याने खोटी मिशी लावली होती. याविषयी अक्षय म्हणाला, “त्या कथेच्या हिशोबाने एका विशिष्ट प्रकारच्या मिशीची गरज होती. आता मी तर तशी मिशी उगवू शकत नाही. जर कोणाला ती गोष्ट आवडली नसेल तर मी माफी मागतो.”

यावेळी अक्षयने हे स्पष्ट केलं की फिल्म मेकिंगदरम्यान काही निर्णयांना टाळणं कठीण असतं. अक्षय वर्षातून दोन ते तीन चित्रपट करतो. त्यामुळे त्याचं शेड्युल वर्षभर व्यस्त असतं. एकाच वेळी विविध चित्रपटांमध्ये काम करावं लागल्याने प्रत्येक भूमिकेनुसार मोठं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं खूप कठीण होऊन जातं. यामुळे सर्वसाधारणपणे मेकअप, प्रोस्थेटिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांच्या मदतीने वेगवेगळे लूक साकारले जातात.

‘सम्राट पृथ्वीराज’ हा बिग बजेट चित्रपट होता. तो बनवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 220 कोटी रुपये खर्च केले होते. परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 90 कोटी रुपये कमावले होते. यामधील अक्षयचा लूक आणि त्याने साकारलेली भूमिका चोख नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *