
त्या म्हणाल्या की, पप्पू यादव यांनी आयोगाची नोटीस कचऱ्याच्या डब्यात टाकून अध्यक्षांवर अशोभनीय टिप्पणी केली. त्यांनी जेडीयूच्या कार्याध्यक्षांसोबत अध्यक्षांचा फोटो शेअर करून अव्यवहार्य भाष्य केले. पप्पू यादव यांच्या या वर्तणुकीची महिला आयोगाने पुन्हा दखल घेतली आहे. नोटिशीमध्ये म्हटले आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रतिमेला तडा गेला असून, याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला जाईल. तसेच, पप्पू यादव यांना ३० एप्रिल रोजी पुराव्यांसह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.