Headlines

ग्रॅच्युईटीच्या नियमात सर्वात मोठा बदल, या नोकरदारांना मोठा फायदा; ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते?

ग्रॅच्युईटीच्या नियमात सर्वात मोठा बदल, या नोकरदारांना मोठा फायदा; ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते?
ग्रॅच्युईटीच्या नियमात सर्वात मोठा बदल, या नोकरदारांना मोठा फायदा; ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते?


नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सेवा दिल्याबद्दल ग्रॅच्युईटी देते. याला एक प्रकारचा लॉयल्टी रिवॉर्ड असेही म्हटले जाऊ शकते. ग्रॅच्युईटी पेमेंट कायदा, 1972 अंतर्गत ज्या संस्थांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतात, त्या ठिकाणी ग्रॅच्युईटी देणे बंधनकारक आहे. ही रक्कम सामान्यतः निवृत्तीवेळी, नोकरी सोडताना किंवा काही विशेष परिस्थितींमध्ये दिली जाते. आता नवीन कामगार कायद्यांनंतर यात मोठे बदल झाला आहे. याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्रॅच्युईटीच्या नियमात मोठा बदल

पूर्वी ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सलग नोकरी करणे आवश्यक होते. मात्र, 2025 मध्ये लागू झालेल्या नवीन लेबर कोडनंतर फिक्स्ड टर्म, कॉन्ट्रॅक्ट आणि गिग वर्कर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युईटी मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र नियमित कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची अट अजूनही कायम आहे.

ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते?

  • ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र खूप सोपे आहे
  • ग्रॅच्युईटी = शेवटचा पगार × नोकरीची वर्षे × (15/26)
  • येथे शेवटच्या पगारामध्ये बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता (DA) समाविष्ट असतो.
  • 26 म्हणजे महिन्यातील कामाचे दिवस
  • 15 म्हणजे 15 दिवसांच्या पगाराच्या आधारावर गणना केली जाते.

10, 20 आणि 30 वर्षांच्या नोकरीनंतर किती रक्कम मिळेल?

जर कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार आणि सेवा कालावधी वेगवेगळा असेल, तर ग्रॅच्युईटीची रक्कम पुढीलप्रमाणे असू शकते…

  • 10 वर्षांची नोकरी + ₹50,000 पगार: अंदाजे ₹2,88,461
  • 20 वर्षांची नोकरी + ₹60,000 पगार: अंदाजे ₹6,92,307
  • 30 वर्षांची नोकरी + ₹70,000 पगार: अंदाजे ₹12,11,528

म्हणजेच, तुमचा पगार आणि नोकरीची वर्षे जितकी वाढतील, तितकी ग्रॅच्युईटीची रक्कमही वाढत जाईल.

कमाल मर्यादा आणि महत्त्वाच्या अटी

कायद्यानुसार, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळू शकते. तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 25 लाख आहे. याशिवाय, एखाद्या कर्मचाऱ्याचा 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची ग्रॅच्युईटीची संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनी किंवा कुटुंबाला दिली जाते.

ग्रॅच्युईटी का महत्त्वाची आहे?

ग्रॅच्युईटीची रक्कम ही रिटायरमेंट प्लॅनिंगचा महत्त्वाचा भाग आहे. नोकरीच्या शेवटी मिळणारी ही मोठी रक्कम भविष्यात आर्थिक सुरक्षितता देण्यास मदत करते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ग्रॅच्युईटीचे नियम आणि गणना समजून घेणे महत्त्वीचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *