Headlines

Raja Shivaji Cast fees: 100 कोटींच्या ‘राजा शिवाजी’मधील कलाकारांची फी जाणून उंचावतील भुवया; सर्वांत कमी मानधन कोणाला?

Raja Shivaji Cast fees: 100 कोटींच्या ‘राजा शिवाजी’मधील कलाकारांची फी जाणून उंचावतील भुवया; सर्वांत कमी मानधन कोणाला?
Raja Shivaji Cast fees: 100 कोटींच्या ‘राजा शिवाजी’मधील कलाकारांची फी जाणून उंचावतील भुवया; सर्वांत कमी मानधन कोणाला?


Raja Shivaji Cast fees: अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 1 मे रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमाबद्दल एका महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, सिनेमात फक्त मराठी कलाकारच नाही तर, बॉलिवूडकरांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभिनेता संजय दत्त याच्यापासून अभिनेत्री विद्या बालन हिच्यापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सिनेमा महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. तब्बल 100 कोटींच्या बडेटमध्ये तयार झालेल्या सिनेमात कलाकारांचं मानधन देखील तगडं आहे. सिनेमातील कलाकारांची फी जाणून तर, तुमच्या भुवया उंचावतील…

‘राजा शिवाजी’ सिनेमातील स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सलमान खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे… तर जाणून घ्या कोणाली किती मानधन मिळालं आहे…

अभिनेता रितेश देशमुख – ‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेश याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमाचं लेखक, निर्माता आणि दिग्दर्शन देखील रितेश यानेच केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमासाठी अभिनेत्याने 15 ते 18 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

अभिनेता संजय दत्त – संजूबाबाने सिनेमात अफझल खान याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने जवळपास 8 – 10 कोटी रुपये घेतले आहेत. चाहते देखील अभिनेत्याला अफझल खानाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चन – सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यासाठी अभिनेत्याने जवळपास 6 ते 8 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे… सिनेमात अभिषेत महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे..

अभिनेत्री जिनिलिया देशमुख – जिनिलिया देशमुख हिने देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिनिलिया हिने महाराजांच्या पत्नी सईबाई यांची भूमिका साकारली आहे. सिनेमात जिनिलिया निर्मिती देखील आहे. भूमिकेसाठी अभिनेत्रीने 1 – 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

अभिनेते महेश मांजरेकर – महेश मांजरेकर यांनी देखील ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमात महाराजांची भूमिका साकारली आहे… तर ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांजरेकर लखुजी जाधव सिनेमात झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी त्यांनी 2 – 3 कोटी मानधन घेतलं आहे.

अभिनेता फरदीन खान – फरदीन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात फरदीन शहाजहाँच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूमिकेसाठी अभिनेत्याला 2 ते 3 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

अभिनेत्री विद्या बालन – सर्व सेलिब्रिटींच्या तुलनेत विद्या बालन हिला सर्वात कमी मानधन मिळालं आहे. सिनेमात अभिनेत्री ‘ताजुल मुखिदरात’ या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी अभिनेत्री 1.5 कोटी मानधन घेतलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *