
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान कोलकात्यातील हुगळी नदीत नौकाविहार करत खास अनुभव घेतला. हुगळी नदीच्या काठावरील निसर्गसौंदर्य पाहत त्यांनी बोटीतून प्रवास केला. यावेळी मोदींनी विद्यासागर सेतू आणि होवर ब्रिज यांची पाहणी केली.
या प्रवासात मोदी यांनी स्वतः कॅमेरा हातात घेऊन परिसरातील सुंदर क्षण टिपले. स्थानिक खलाशी आणि सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गंगा नदी ही बंगाली संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत त्यांनी या नदीशी असलेले भावनिक नाते व्यक्त केले.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.