Headlines

अशोक खरात इतकाच भयंकर डेंजर बाबा पकडला, महाराष्ट्रात लुटायचा आणि… किती बड्या हस्तींचा वरदहस्त?

अशोक खरात इतकाच भयंकर डेंजर बाबा पकडला, महाराष्ट्रात लुटायचा आणि… किती बड्या हस्तींचा वरदहस्त?
अशोक खरात इतकाच भयंकर डेंजर बाबा पकडला, महाराष्ट्रात लुटायचा आणि… किती बड्या हस्तींचा वरदहस्त?


Manjunath Shetty Dixit Baba: नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण अद्यापही ताजं असताना, आणखी एका भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आले आहे. आरोपी मंजूनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा स्वतःला तांत्रिक सांगून, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत होता.. काळ्या जादूची भीती दाखवून तो लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्याकडून लाखो, कोट्यवधी रुपयांची लूट करायचा… अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहेत.

संबंधित प्रकरण मुंबई आणि ठाणे येथील परिसरातील आहे… जेथे दीक्षित बाबा गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय होता. तो लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा आणि सांगायचा की, तुमच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे. कुटुंबावर मोठं संकट येणार आहे… एवढंच नाही तर, त्यानंतर तो विशेष पूजा, तंत्र-मंत्र आणि अघोरी विधींच्या नावाखाली त्यांच्याकडून लाखो ते करोडो रुपये गोळा करायचा.

दीक्षित बाबा संतान प्राप्ति, व्यवसायात लाभ, आजारातून सुटक… यांसारख्या गोष्टींचं आमिष दाखवत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा… त्यानंतर त्याच्या म्हणण्यानुसार, लोकं देखील त्यांच्या मेहनतीची कमाई बाबाला देत असे… कारण सर्व समस्या दूर होतील… असा विश्वास त्यांच्या मनात होता. पण सत्य काही वेगळचं आहे.

तपास यंत्रणांना असं आढळून आलं आहे की, बाबा गोळा केलेला पैसा धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांसाठी वापरत नव्हता, तर जुगार आणि चैनीसाठी वापरत होता. गोव्यात कॅसिनोमध्ये दीक्षित बाबा जुगार खेळायचा… अशी माहिती देखील समोर येत आहे की, सर्व पैसे संपल्यानंतर नवी शिकार शोधायचा.

बाबाचं पितळ तेव्हा उघडकील आलं जेव्हा पोलिसांना त्याच्या कृत्यांबद्दल माहिती मिळाली. ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला गोव्यातील एका कॅसिनोमधून अटक केली. अटकेनंतर आरोपीची चौकशी सुरू असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर, यामध्ये किती बड्या हस्तींचा वरदहस्त आहे? अशा सर्व बाजूंनी कसून तपास सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *