Headlines

Aam Aadmi Party | दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, केजरीवालांचा आम आदमी पक्ष फुटला; बड्या नेत्याच्या नेतृत्वात सात खासदारांनी पक्ष सोडला; या पक्षात होणार सामील

आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद तीव्र झाल्यामुळे आता पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राघव चड्डा यांच्यासह आणखी 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा आणि इतर खासदारांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने आप साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षासाठी ही घडामोड महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, या निर्णयावर आप नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी पक्षात अंतर्गत घडामोडी वेगाने सुरू असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, भाजपासाठी हा राजकीय फायदा मानला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत आणखी नेते पक्षांतर करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *