
DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ?Image Credit source: IPL/BCCI
आयपीएल 2026 स्पर्धेतील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. खरं येथून पुढे प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. पंजाब किंग्सने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत पंजाब किंग्सने 6 सामने खेळले असून एकही गमावलेला नाही. पाच सामन्यात विजय मिळवला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब किंग्सच्या पारड्यात 11 गुण असून प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. आता तीन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात विजय, तर 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 6 गुण असून -0.130 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघात तूल्यबल लढत असणार आहे.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने पार पडले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांवर आपला दबदबा दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांनी प्रत्येकी 17 सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघ 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी 6-6 विजय मिळवले आहेत. त्यामुळे येथेही तसंच आहे. त्यामुळे आता या सामन्यात विजय मिळवून कोण पुढे जातं याची उत्सुकता आहे. मागच्या पर्वात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. त्यापैकी एक सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट राखून जिंकला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची सर्वोच्च सांघिक धावसंख्या 231 आहे, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या 67 आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 206 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे, तर या स्पर्धेतील त्यांची सर्वात कमी धावसंख्या 104 आहे. अशा जवळच्या विक्रमांमुळे आणि रोमांचक धावसंख्येच्या ट्रेंडमुळे दोन्ही संघांची लढत चुरशीची होणार असं दिसत आहे. या दोन संघांमधील सामन्यांची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात असतात त्याला कारणही तसंच आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारते ते पाहणं औतुक्याचं ठरणार आहे.