Headlines

Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.

Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.
Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.

बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराड टोळीकडून एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप समोर आला होता. या प्रकरणात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यानंतर आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

बीडच्या जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड टोळीची दहशत पुन्हा वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला मारहाण केली. त्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी त्याला ‘दहा हजार रुपये घे’ असं सांगितल्याचं ऑडिओ क्लिपद्वारे समोर आलं.

कारागृह कराडच्या जीवावर चालतंय, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट, टीव्ही मिळतो. कारागृह प्रशासनही काही करत नाहीये. कराडने कैद्यांना मारलं, त्रास देऊन ठेवला आहे, असंही ऑडिओ क्लिपमध्ये कैदी सनी आठवले याने सांगितले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *