Headlines

अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, 26 वर्षांपूर्वीच्या एन्काउंटरचा सूड! कुख्यात गुंड सादिक कालियाच्या भाच्याने घरात घुसून वृद्धाला संपवले

अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, 26 वर्षांपूर्वीच्या एन्काउंटरचा सूड! कुख्यात गुंड सादिक कालियाच्या भाच्याने घरात घुसून वृद्धाला संपवले
अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, 26 वर्षांपूर्वीच्या एन्काउंटरचा सूड! कुख्यात गुंड सादिक कालियाच्या भाच्याने घरात घुसून वृद्धाला संपवले


मुंबईत अंडरवर्ल्डच्या काळातील जुन्या वादातून एका ७८ वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. १९९९ मध्ये एन्काउंटरमध्ये मारला गेलेला कुख्यात गुंड सादिक कालिया याच्या भाच्याने माझ्या काकाला पोलिसांनी मारले, त्यात या वृद्धाचा हात होता असा संशय मनात ठेवला होता. याच राग मनात धरून सादिक कालियाने त्या वृद्धाची हत्या केल्याची माहिती समोर आली. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना नागपूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

सोमवारी २० एप्रिल रोजी संध्याकाळी ही थरारक घटना मुंबईतील नागपाडा भागात घडली. ७८ वर्षांचे इक्बाल इब्राहिम सेलिया हे आपल्या घरात एकटेच होते. कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले असताना ही संधी साधून दोन तरुण घरात शिरले. त्यांनी धारदार शस्त्राने सेलिया यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर सेलिया यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी पसार झाले.

हत्येमागचे कारण काय?

यानंतर पोलिसांनी तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी सादिक जवार (वय २९) हा गुंड सादिक कालियाचा भाचा आहे. सादिक जवारचा असा ठाम विश्वास होता की, त्याचे काका सादिक कालिया हे पोलिसांचे खबरी होते. त्यांच्या माहितीमुळेच १९९९ मध्ये कालियाचे एन्काउंटर झाले होते. अनेक वर्षांपासून हा सूड मनात धरून जवारने या वृद्ध व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचला.

कोण होता सादिक कालिया?

सादिक कालिया हा ९० च्या दशकात मुंबईतील काळाचौकी परिसरात फूटपाथवर बूट विकण्याचे काम करायचा. खंडणीच्या वादातून तो छोटा शकील टोळीच्या संपर्कात आला आणि अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाला. नोव्हेंबर १९९९ मध्ये एका मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले होते.

या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेने परिसरातील CCTV फुटेज तपासले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना आरोपींच्या हालचाली समजल्या. हत्येनंतर आरोपी मुंबई सोडून कल्याणला गेले. तिथून वेगवेगळ्या मार्गांनी नागपूरला पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सादिक जवार आणि त्याचा साथीदार नौशाद मिथानी (वय २२) यांना नागपूरमधून अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *