Headlines

Prashant Ambi | शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

Prashant Ambi | शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा
Prashant Ambi | शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा


‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वाद निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पुरोगामी संघटनांसह डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली.
दरम्यान, CPI च्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत गायकवाड यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. “संजय गायकवाडचं काय करायचं? खाली डोकं, वर पाय” अशा घोषणा देत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रशांत आंबी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या पुस्तकाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर करण्याचा नाही. आम्ही संविधानिक पद्धतीने आमचा लढा सुरू ठेवू.”
यापूर्वीही या मुद्द्यावर कोल्हापुरात आंदोलन झाले होते. त्यानंतर आजचा मोर्चा काढण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *