Headlines

हे ज्याने केलं त्याच्या… धर्म विचारून हल्ला करताच पडळकर प्रचंड संतापले; केली मोठी मागणी!

हे ज्याने केलं त्याच्या… धर्म विचारून हल्ला करताच पडळकर प्रचंड संतापले; केली मोठी मागणी!
हे ज्याने केलं त्याच्या… धर्म विचारून हल्ला करताच पडळकर प्रचंड संतापले; केली मोठी मागणी!


मुंबईतून संतापजनक बातमी समोर आली आहे. रविवारी सकाळी मीरा रोड पूर्वमधील नयानगर येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ एका निर्माणाधीन इमारतीत एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या जैब जुबेर अन्सारीने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढण करता येतं का असं विचारून सुरक्षारक्षकावर हल्ला केला. धर्म विचारून हल्ला झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे. पडळकर यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

ही मग्रुरी आता थांबवावी लागेल – पडळकर

मीरा रोडमधील घटनेवर बोलताना पडळकर यांनी म्हटले की, ‘मी मीरा रोड येथील घटनेचा जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे अत्यंत सक्षम गृहमंत्री व मुख्यमंत्री आहेत. ज्याने हे नीच कृत्य केले आहे त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार सक्षम आहे. पोलिसांनी या घटनेमागे कोण आहे या सर्वांचे धागेदोरे तपासण्याची गरज आहे. धर्म विचारून वार करणं म्हणजे यांची मग्रुरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. ही मग्रुरी आता थांबवावी लागेल.’

पडळकरांची मोठी मागणी

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, ‘दिवसेंदिवस अशा घटना करण्याचा प्लॅन या लोकांचा आहे. लव जिहाद, कार्पोरेट जिहाद, लँड जिहाद, ज्यूस जिहाद आता हे नवीनच प्रकरण समोर आलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालेलं आहे की धर्म विचारून वार करण्यात आले. यावर नक्की कठोरातली कठोर कारवाई होईल याबाबत चिंता करण्याची बाब नाही. अशा कंपन्यांमध्ये जिहादी प्रवृत्तीची लोक ठेवलीच का आहेत? महाराष्ट्रातील कार्पोरेट कंपन्यांनी धर्मांध जिहादी प्रवृत्तीची कर्मचारी सिक्युरिटी असेल किंवा वरिष्ठ पोस्टवर असेल चौकशी करून यांना हाकलून दिले पाहिजे. अशा वृत्तीचा एकही माणूस कंपनीमध्ये कामाला ठेवता कामा नये ज्याने कोणी हे नीच काम केलं आहे त्याच्या XXXX सालटे निघेल. त्याचे ज्याच्याशी संबंध असतील त्याचे देखील गुडघे सोलले जातील.’

जैब झुबेर अन्सारी कोण आहे?

जैब झुबेर अन्सारीचे आईवडिलांशी भांडण झाल्यामुळे अमेरिका सोडून भारतात आला होता. आरोपीचा जन्म कुर्ला परिसरातील असून त्याचे शिक्षणही अमेरिकेत झाले आहे. बायोलॉजीमधून पदवी प्राप्त झालेला जैब झुबेर अन्सारी 2019 पासून भारतात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहीलेली नोटसुद्धा आढळली. आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *