Headlines

वैभव सूर्यवंशी स्टार होऊ शकतो पण…मनू भाकरच्या विधानाने नव्या वादाला तोंड; सोशल मीडियावर तुफान!

वैभव सूर्यवंशी स्टार होऊ शकतो पण…मनू भाकरच्या विधानाने नव्या वादाला तोंड; सोशल मीडियावर तुफान!
वैभव सूर्यवंशी स्टार होऊ शकतो पण…मनू भाकरच्या विधानाने नव्या वादाला तोंड; सोशल मीडियावर तुफान!


Vaibhav Suryavanshi And Manu Bhaker : सध्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा वैभव सूर्यवंशी हा खेळाडू खूपच चर्चेत आहे. तो राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत आहे. तो बॅट घेऊन मैदानात उतरला की अक्षरश: चौकार आणि षटकारांची आतषबाजीत पाहायला मिळते. त्याची ही कामगिरी पाहून लवकरच त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे क्रिकेटविषयी माहिती असणाऱ्या अनेक जाणकारांनीही वैभव भविष्यातला भरताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होऊ शकतो, असे मत व्यक्त केलेले आहे. दरम्यान, आता नेमबाजी या खेळ प्रकारात भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरनेही वैभव सूर्यवंशीच्या खेळावर आपले मत व्यक्त केले आहे. परंतु तिने दिलेल्या उत्तरानंतर मोठा वाद रंगला आहे.

मून भाकर नेमकं काय म्हणाली?

खरं म्हणजे मनू भाकरने वैभव सूर्यवंशीचे कौतुकच केले आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा मोठा स्टार होऊ शकतो, असे मत तिने व्यक्त केले आहे. “मेंटॉरशीप चांगली असेल, आजूबाजूचे लोक चांगले असतील तर यश मिळतेच. वय हा फक्त एक आकडा असतो. टॅलेंटसाठी वयाची गरज आणि अट नसते. फक्त तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला कसे मार्गदर्शन करतात, यावर तुमचे यश अवलंबून असते. वैभव सूर्यवंशीला मार्गदर्शन करणारे लोक चांगले असतील तर निश्चितच तो भारताचा आगामी स्टार खेळाडू असेल,” असे मत मनू भाकरने व्यक्त केले.

नेमका आक्षेप काय?

दरम्यान, मनू भाकरची ही प्रतिक्रिया समोर आल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएलच्या संघाचे माजी संचालक आणि क्रीडा क्षेत्रातील चर्चेत असलेले जय भट्टाचार्य यांनी एक आक्षेप व्यक्त केला आहे. “मनू भाकर ही एक ऑलिम्पिक पदक विजेता आहे. तिला वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीबद्दल विचारणे हे तिच्या यशाचा, कामगिरीचा अपमान करण्यासारखे आहे. तिच्यावर हा एका प्रकारचा अन्यायच आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. वैभव सूर्यवंशीवर हेडलाईन तयार करण्यासाठी अन्य क्रीडा सेलिब्रेटीच्या प्रतिक्रियेची गरज नाही,” असे मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. मनू भाकरला वैभव सूर्यवंशीविषयी विचारणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *