Headlines

विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत

विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत


विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे. पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी उधाण आले आहे.
ठोंबरे पाटील यांनी आपल्या स्टेटसमध्ये “लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. आज विधान परिषद मिळाली नसली तरी वेळेची समीकरणं बदलतात. आपल्या कर्तृत्वाला आणि लढाऊपणाला कोणीही नाकारू शकत नाही,” असा आशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सुषमा अंधारे यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली जात असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे नाराज असल्याच्या चर्चांवर विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी अंधारे यांना अजून मोठा राजकीय प्रवास करायचा असल्याचे सांगत, त्यांनी खचून जाऊ नये असा सल्ला दिला. तर दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी अंधारे नाराज नसल्याचे स्पष्ट करत, त्या पक्षाच्या कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे म्हटले.
राऊत यांनी पुढे सांगितले की, “विधान परिषदेसाठी एकच जागा उपलब्ध होती आणि ती उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना दिली.” त्यामुळे या निर्णयामागे राजकीय गणित असल्याचेही संकेत त्यांनी दिले. एकूणच, विधान परिषद उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये अंतर्गत हालचाली आणि चर्चांना वेग आला असून, येत्या काळात या घडामोडींचा पक्षाच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *