Headlines

Mumbai-Pune Missing Link | मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, 8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर तत्काळ या मार्गावर सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली असून, प्रवाशांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. सुमारे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा महत्त्वाचा रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विशेषतः घाटातील कोंडी टाळून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात मोठा दिलासा मिळणार असून, राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *