Headlines

CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?

CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?
CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 2 मे पासून रिव्हेंज वीकला सुरुवात होत आहे. या रिव्हेंज वीकमधील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा होणार आहे. या सामन्यात आयपीएलमधील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात लढत होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. चेन्नई विरुद्ध मुंबई या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने उभसंघात होणाऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शनिवारी 2 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच लाईव्ह सामन्यातील अपडेट्स टीव्ही9 मराठी वेबसाईटवरील https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकद्वारे जाणून घेता येतील.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

मुंबई-चेन्नईत कडवी झुंज

दरम्यान मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना कायम मुंबई-चेन्नई सामन्याची प्रतिक्षा असते. उभयसंघात होणाऱ्या सामन्याला एल क्लासिको म्हटलं जातं. त्यामुळे उभयसंघात 2 गुणांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *