Headlines

वास्तुनुसार घरात एसी बसवताना ‘ही’ चूक टाळा, नाहीतर थंडाव्याबरोबरच वाढू शकतो तणाव

वास्तुनुसार घरात एसी बसवताना ‘ही’ चूक टाळा, नाहीतर थंडाव्याबरोबरच वाढू शकतो तणाव
वास्तुनुसार घरात एसी बसवताना ‘ही’ चूक टाळा, नाहीतर थंडाव्याबरोबरच वाढू शकतो तणाव


देशभराच्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याने लोकं आपल्या घरात नवीन एसी लावत आहेत. अशातच एसी लावण्यासाठी केवळ खरेदी करणे पुरेसे नाही; तर तो घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला बसवणे देखील महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला बसवलेला एसी केवळ आरामातच बाधा आणत नाही, तर घराच्या वातावरणावरही नकारात्मक परिणाम करतो. चला तर मग आजच्या लेखात आपण एसी बसवण्याची योग्य दिशा आणि नियम जाणून घेऊयात.

घरात एसी लावण्याची सर्वात शुभ दिशा

वास्तु तज्ञांच्या मते एसी लावण्याची सर्वात योग्य दिशा आग्नेय आहे. या दिशेला अग्नी कोन म्हणतात. ही दिशा विद्युत उपकरणांसाठी शुभ मानली जाते. या दिशेत एसी लावल्याने खोलीत संतुलन राखले जाते आणि आरामदायक वातावरण निर्माण होते. तथापि जर आग्नेय दिशा उपलब्ध नसेल, तर एसी लावण्यासाठी पश्चिम किंवा वायव्य दिशा चांगल्या मानल्या जातात. या दिशांमध्ये हवेचा प्रवाह चांगला असतो, ज्यामुळे खोली लवकर थंड होण्यास मदत होते आणि चांगली झोप लागते.

या दिशानिर्देशांनुसार एसी बसवणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेत एसी लावणे अशुभ मानले जाते, कारण ही घरातील एक पवित्र दिशा मानली जाते. त्याचप्रमाणे, नैऋत्य दिशा देखील एसीसाठी अशुभ मानली जाते. यामुळे घरात मानसिक असंतुलन आणि तणाव वाढू शकतो.

बेडरूममध्ये एसी बसवण्याचे योग्य नियम

तुमच्या बेडरूममध्ये एसी लावताना तो थेट पलंगाच्या वर लावणार नाही याची काळजी घ्या. यामुळे थंड हवा थेट शरीरावर पडते, ज्यामुळे सर्दी आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. एसी पलंगाच्या बाजूला लावणे उत्तम.

वाऱ्याच्या दिशेकडे लक्ष द्या

एसीमधून येणारी हवा कधीही थेट डोक्यावर किंवा चेहऱ्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. वास्तूनुसार थेट आणि जोरदार हवेमुळे घरातील वातावरणाचे संतुलन बिघडू शकते.

खोलीच्या मध्यभागी एसी का लावू नये?

वास्तूनुसार खोलीचा मध्यभाग ब्रह्मस्थान मानला जातो आणि तो मोकळा ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे, एसी खोलीच्या मध्यभागी कधीही ठेवू नये. तो भिंतीजवळ लावणे अधिक चांगले.

विंडो एसी

विंडो एसीसाठी पश्चिम किंवा दक्षिण दिशा आदर्श मानली जाते. नियमित स्वच्छता देखील आवश्यक आहे, कारण अधिक धुळ आणि घाण जमा झाल्यास एसीमधून थंडावा कमी मिळते आणि परंतू थंडाव्यासाठी जास्त वीज वापरली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *