Headlines

उन्हाळ्यात ‘या’ टिप्सच्‍या मदतीने लिंबू राहतील 2-3 आठवडे एकदम फ्रेश आणि रसदार

उन्हाळ्यात ‘या’ टिप्सच्‍या मदतीने लिंबू राहतील 2-3 आठवडे एकदम फ्रेश आणि रसदार
उन्हाळ्यात ‘या’ टिप्सच्‍या मदतीने लिंबू राहतील 2-3 आठवडे एकदम फ्रेश आणि रसदार


उन्हाळा सुरू झाला की लिंबाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. कारण लिंबाचा इतर पदार्थांमध्ये लिंबाचा वापर करण्यासोबतच या दिवसांमध्ये लिंबू पाण्याचा आहारात समावेश होतो. कारण लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीर आतून थंड आणि हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढण्यासोबतच बाजारभावही वाढतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण बाजारातून योग्य भावात जास्त लिंबू खरेदी करतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू लवकर खराब होतात. म्हणून लिंबू जास्त दिवस फ्रेश टिकवून ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स तुम्ही जाणून घेतल्यातर 3 आठवड्यापेक्षाही अधिक दिवस फ्रेश लिंबू स्टोर करता येतात.

तुम्ही खरेदी केलेले लिंब खराब न होता 2 ते 3 आठवडे ताजी ठेवायची असतील, तर या काही सोप्या पण प्रभावी टिप्सबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

लिंबू फ्रेश रसदार ठेवण्‍यासाठीच्या सोप्या टिप्स

मोहरीचा किंवा नारळाच्या तेलाचा वापर

तुम्हाला जर लिंबू जास्त दिवस फ्रेश ठेवायचे असतील तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम लिंबू स्वच्छ धुवा आणि नंतर कोरडे करा. आता हातांनी लिंबांना तेल लावा. यासाठी तुम्ही मोहरीचे किंवा नारळाचे तेल वापरू शकता. आता तेल लावलेले लिंबू एका हवाबंद डब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे लिंबांमधील ओलावा टिकून राहील आणि ते लवकर सुकणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत. तुम्हाला जर लिंबू दिर्घकाळ टिकवून ठेवायचे असतील तर तुम्ही लिंबांचे लहान तुकडे करून, त्यांना मीठ लावून, एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे ते अनेक महिने सहज वापरता येतात आणि त्यांची चवही टिकून राहते.

ही पद्धत देखील काम करेल

लिंबू दिर्घकाळ साठवण्यासाठी पाण्याची पद्धत हा देखील एक उत्तम मार्ग आहे. ताजे लिंबू कापून ते स्वच्छ धुवा. कापलेले लिंबू एका हवाबंद काचेच्या भांड्यात ठेवा. लिंबू पूर्णपणे बुडतील इतके पाणी त्यामध्ये टाका. त्यानंतर, भांड्याला झाकण लावा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीमुळे लिंबांमधील ओलावा कमी होत नाही आणि ते सुकत देखी नाहीत. या ट्रिक्सच्या मदतीने लिंबू अनेक आठवडे ताजे राहतात. दर 7 ते 10 दिवसांनी फक्त पाणी बदला आणि गरजेनुसार लिंबांचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *