Headlines

SSC Results 2026 : दहावीत कमी गुण पडले? पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या प्रक्रिया

SSC Results 2026 : दहावीत कमी गुण पडले? पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या प्रक्रिया
SSC Results 2026 : दहावीत कमी गुण पडले? पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या प्रक्रिया


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना तो टीव्ही 9 मराठीच्या वेबसाइटवरही तपासता येणार आहे. यंदा राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. त्यात नेहमीप्रमाणेच कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर राज्यात पुन्हा मुलीच हुशार ठरल्या आहेत. मुलींच्या पास होण्याची टक्केवारी 94.96 टक्के आहे, तर मुलांची पास होण्याची टक्केवारी 89.56 टक्के आहे.

विद्यार्थ्यांसाठी एटी-केटीची सुविधा लागू केली असून त्यामध्ये 41 हजार 65 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रती या सर्वांची प्रक्रिया ठरली आहे. शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर ही संपूर्ण प्रक्रिया उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापासून (9 मे, 2026) आहे. 23 मे 2026 पर्यंत विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. मंडळाने या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत. उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत आधी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. ती प्रत मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला गुण कमी मिळाले असं वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज 9 मे ते 23 मे 2026 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने mahasscboard.in या संकेतस्थळावरून सादर करता येतील. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक आहे. एक किंवा दोन विषयात नापास झाले तरी विद्यार्थ्याला इयत्ता ११ वीत प्रवेश दिला जातो. त्यांना एटीकेटीची सोय करुन देण्यात आली आहे.

गुणपडताळणी प्रक्रिया

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी 50 रुपये शुक्ल भरावं लागणार आहे. या प्रक्रियेत एकूण गुणांची गणना करण्यात येईल.

  • verification.msbshse.co.in या संकेतस्थळावर लॉगिन करा
  • तुमचा आसन क्रमांक आणि इतर तपशील भरा
  • ऑनलाईन शुल्क जमा करा
  • आता सबमिट करा

विभागानुसार निकालाची टक्केवारी-

कोकण- 97.62%

कोल्हापूर- 95.47%

मुंबई- 94.97%

पुणे विभाग- 94.24%

नाशिक- 90.93%

अमरावती- 90.50%

नागपूर- 89.07%

लातूर- 88.42%

छत्रपती संभाजीनगर- 88.41%

शिक्षण मंडळाकडून टेलिमानस हेल्पलाइन क्रमांकसुद्धा जारी करण्यात आला आहे.

टेलिमानस हेल्पलाईन- 14416
मनोदर्शन हेल्पलाईन- 8448440632

या नंबरवर समुपदेशनासाठी पालक-विद्यार्थ्यांसाठी सेवा उपलब्ध आहे. एससीईआरटीमार्फत 315 समुपदेशक नेमले आहेत. तर गेल्या परीक्षपर्यंत मार्कशीट आणि सर्टिफिकेट वेगवेगळे छापण्यात येत होते. आता एकाच पेपरवर विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *