Headlines

सर्वात मोठी बातमी! धाड-धाड गोळीबारानंतर भारतीय जहाज बुडालं… होर्मुझमध्ये भयंकर घडलं

सर्वात मोठी बातमी! धाड-धाड गोळीबारानंतर भारतीय जहाज बुडालं… होर्मुझमध्ये भयंकर घडलं
सर्वात मोठी बातमी! धाड-धाड गोळीबारानंतर भारतीय जहाज बुडालं… होर्मुझमध्ये भयंकर घडलं


गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूनीवर आता होर्मुज सामुद्रधुनीत एक मोठी समुद्री दुर्घटना घडली आहे. ताज्या माहितीनुसार, गोळीबाराच्या तडाख्यात सापडल्याने एका भारतीय मालवाहू जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या जहाजावरील इतर 17 कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. हे जहाज दुबईहून येमेनकडे जात असताना क्रॉस फायरिंगमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुजरातच्या नाविकाचा मृत्यू

इराण आणि अमेरिका यांच्यातील गोळीबारात भारतीय जहाज बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मृत नाविकाची ओळख अल्ताफ तलब कर अशी झाली आहे. तो गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील जाम सलाया येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आळी आहे. 18 कर्मचाऱ्यांसह ‘अल फैज नूर सुलेमानी’ हे मालवाहू जहाज होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना अचानक गोळीबार सुरू झाला. हल्ल्याच्या वेळी अल्ताफ केर हे जहाजाच्या इंजिन रूमजवळ उपस्थित होते. गोळीबारात जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि ते हळूहळू बुडाले अशी माहिती समोर आली आहे.

17 जणांना दुसऱ्या जहाजाने वाचवले

भारतीय नौकानयन जहाज संघटनाचे महासचिव आदम भाया यांनी सांगितले की, या घटनेनंतर जवळून जात असलेल्या ‘प्रेम सागर’ या जहाजाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान जहाजावरील उर्वरित 17 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सर्वांना शुक्रवारी संध्याकाळी दुबई येथे पोहोचवण्यात आले. या जहाजावरील सर्व कर्मचारी हे भारतीय नागरिक होते.

भारतीय वाणिज्य दूतावासाकडून शोक व्यक्त

भारतीय वाणिज्य दूतावास दुबई यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, समुद्रातील या दुर्दैवी घटनेत एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आता दूतावास जहाज मालकाशी संपर्कात असून, मालकारा शक्य ती सर्व मदत केली जाणार आहे. तसेच घटनेशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात असल्याचेही दुतावासाने सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *