Headlines

नेहराचा डगआऊटमधून इशारा आणि मोहम्मद सिराजची कृती, वैभव सूर्यवंशीचा खेळ असा आटोपला Video

नेहराचा डगआऊटमधून इशारा आणि मोहम्मद सिराजची कृती, वैभव सूर्यवंशीचा खेळ असा आटोपला Video
नेहराचा डगआऊटमधून इशारा आणि मोहम्मद सिराजची कृती, वैभव सूर्यवंशीचा खेळ असा आटोपला Video


नेहराचा डगआऊटमधून इशारा आणि मोहम्मद सिराजची कृती, वैभव सूर्यवंशीचा खेळ असा आटोपला VideoImage Credit source: video grab/Twitter

आयपीएल 2026 स्पर्धेतील गुजरात टायटन्स संघाला आशिष नेहराचे मार्गदर्शन मिळत आहे. स्पर्धेत आगमन झाल्यापासून गुजरात टायटन्स आशिष नेहराच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करत आहे. प्रशिक्षक आशिष नेहराने पुन्हा एकदा आपल्या रणनितीतून गुजरात टायटन्सचा खेळ उंचावण्यात मदत केली आहे. क्रिकेट हा खेळ शारीरिक ताकदीचा नाही तर बुद्धीमत्तेचा असल्याचं दाखवून दिलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक खेळ सुरू होता. त्यामुळे त्याला रोखणं काहीही करून गरजेचं होतं. कर्णधार शुबमन गिलने मोहम्मद सिराजकडे चेंडू सोपवला आणि त्यानंतर डगआऊटमधून नेहराने एक इशारा केला. त्या इशाऱ्यानंतर मोहम्मद सिराजने तसंच काहिसं केलं आणि वैभव सूर्यवंशीची विकेट काढली आहे.

वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूंमध्ये 36 धावा करणाऱ्या वैभवची कामगिरी पाहून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा हतबल झाले होते. सिराजच्या चेहऱ्यावरची हतबलता पाहून आशिष नेहराने एक इशारा केला. त्यानंतर मोहम्मद सिराजने वैभवला एक शॉर्ट बॉल बाउन्सर टाकला. वैभव 146.6 किमी प्रतितास वेगाने आलेल्या घातक बाउन्सरवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अयशस्वी ठरला. चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि वर चढला. अर्शद खानने कोणतीही चूक न करता झेल पकडला आणि त्याचा खेळ आटोपला.

वैभव सूर्यवंशीची विकेट पडताच सिराज उत्साहाने गर्जना करताना दिसला. सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले होते. विकेट पडल्यानंतर कॅमेरामनने आशिष नेहऱ्याकडे कॅमेरा फिरवला. यावेळी आशिष नेहराच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होतं. त्याने रचलेला प्लान यशस्वी झाल्याने आनंद साजरा करत होता. वैभव सूर्यवंशी या पर्वात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 11 डावांमध्ये 40 च्या सरासरीने आणि 236.55 च्या स्ट्राइक रेटने 440 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकेही आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *