
दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावेळीही 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. दुसरीकडे या कथित पेपरफुटीचा तपासही चालू करण्यात आला आहे. याच तपासात महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे. या पेपरफुटीत नाशिक कनेक्शन समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले आहे. तपास संस्थांनी नासिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरू असल्याचं सागंतलं जात आहे. या आरोपीद्वारे नाशिकच्या प्रिंटी प्रेसमध्ये प्रश्न पुत्रिकेची प्रिंट झाल्याची शंका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकनंतर प्रश्न पत्रिका हरियाणा आणि इतर पाच राज्यात गेली. असा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.