Headlines

मोठी बातमी! मित्र रशियाचा भारताला मोठा धक्का, थेट पाकिस्तानसोबत मिळून बनवली मोठी योजना, शत्रू सारखा वागला

मोठी बातमी! मित्र रशियाचा भारताला मोठा धक्का, थेट पाकिस्तानसोबत मिळून बनवली मोठी योजना, शत्रू सारखा वागला
मोठी बातमी! मित्र रशियाचा भारताला मोठा धक्का, थेट पाकिस्तानसोबत मिळून बनवली मोठी योजना, शत्रू सारखा वागला


रशिया भारताचं मित्र राष्ट्र आहे. संकट काळात अनेकदा रशियानं भारताला मदत देखील केली आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्च तेल निर्यात केलं जातं होतं. त्यामुळे भारताचा मोठा फायदा देखील झाला. परंतु जसं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाला त्यानंतर रशियानं देखील आपली भूमिका बदलली. रशियाकडून क्रूड ऑईलचे दर वाढवण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार त्याचा मोठा फटका भारताला बसला, मात्र दुसरीकडे रशियाने युद्धाच्या काळात देखील पाकिस्तानला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार आता पाकिस्तान आणि रशियामधील जवळीक आणखी वाढली आहे. यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रशियामधील पाकिस्तानचे रजादूत फैसल नियाज तिरमिजी यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तान आता रशियाकडून अधिकाधिक तेल खरेदी करण्याची योजना बनवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील पाकिस्तानला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा -तेव्हा रशियाने त्यांना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान आणि रशियामधील सैन्य सहकार्य देखील अधिक वेगाने वाढत असून, हा देखील भारतासाठी मोठा धोका मानला जात आहे.

रशियन सरकारी वृत्तसंस्था असलेल्या तासने दिलेल्या माहितीनुसार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या होर्मूजची सामुद्रधुनी बंद आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने रशियाकडून जास्तीत जास्त तेल खरेदी करण्याची योजना बनवली आहे. गेल्या मार्च -एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं रशियाकडून जेवढं तेल खरेदी केलं आहे, त्या तेल खरेदीचं प्रमाण हे मागील अडची वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे.

होर्मूजमध्ये तणाव 

दरम्यान अजूनही होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र तरी देखील या दोन्ही देशांकडून एकमेकांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. हा मार्ग बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *