Headlines

काय सांगता? माणसाचा हा अवयव सर्वात घाण… टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

काय सांगता? माणसाचा हा अवयव सर्वात घाण… टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
काय सांगता? माणसाचा हा अवयव सर्वात घाण… टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!


आपण अनेकदा चेहरा, हात आणि केसांच्या स्वच्छतेकडे भरपूर लक्ष देतो, पण शरीराच्या इतर भागांकडे दुर्लक्ष करतो. आपल्या शरिराचा असा एक अवयव आहे, जो टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाण आहे. या अवयवात टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू लपलेले असू शकतात. आज आपण हा अवयव कोणता आहे? हा अवयव अस्वच्छ असण्याची कारणे काय आहेत? त्याची काळजी कशी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपल्या शरीराचा सर्वात घाण अवयव म्हणजे पायांची नखे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पायांच्या नखांमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही हजारो पटीने अधिक जंतू लपलेले असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, पाय दीर्घकाळ बूट-मोज्यांमध्ये बंद असतात, अनेकदा पायाला घाम येतो, तसेच पायाच्या या भागाची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे नखांमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढू लागते. याच कारणामुळे पायांची नखे अनेकदा इन्फेक्शन, दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्यांचे कारण ठरतात. वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर हे लहानसे दिसणारे जंतू मोठी समस्या निर्माण करू शकतात.

पायांच्या नखांमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू

संशोधन आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायांची नखे हा शरीराचा असा भाग आहे ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. मात्र, याच नखांमध्ये सर्वाधिक बॅक्टेरिया वाढतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार, लांब आणि घाणेरड्या नखांच्या खाली मोठ्या प्रमाणात जंतू आणि बॅक्टेरिया साचू शकतात, जे संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरतात.

पाय बहुतेक वेळा बूट आणि मोज्यांमध्ये बंद असतात, त्यामुळे तिथे घाम आणि ओलावा कायम राहतो. हे वातावरण जंतूंना वेगाने वाढण्यास पोषक ठरते. नखांची नियमित स्वच्छता केली नाही तर त्यामध्ये घाण, मृत त्वचा आणि बॅक्टेरिया जमा होतात, जे अनेकदा टॉयलेट सीटवर आढळणाऱ्या जंतूंहूनही अधिक असू शकतात.

मुलांच्या नखांमध्येही वाढतात जंतू

डॉ. इमरान पटेल यांच्या मते, मुलांच्या नखांची नियमित स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर सांगतात की मुलांच्या नखांमध्येही टॉयलेट सीटपेक्षा जास्त जंतू असतात. एका अभ्यासानुसार, जर टॉयलेट सीटवर 50 जंतू असतील तर घाणेरड्या नखांमध्ये 3000 पेक्षा जास्त जंतू असू शकतात. अशा हातांनी मुलं वारंवार तोंडाला स्पर्श करतात, त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संसर्गांचा धोका वाढतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा मुलांची नखे कापणे आणि त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

पायांच्या नखांची स्वच्छता कशी करावी?

पायांच्या नखांची स्वच्छता करण्यासाठी फक्त नखे कापणे पुरेसे नाही, तर त्यांची आतूनही स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी पाय काही वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर नखांच्या आत साचलेली घाण काढण्यासाठी नेल ब्रश किंवा मऊ ब्रश वापरा. आंघोळीनंतर पाय आणि बोटांच्या मधली जागा व्यवस्थित कोरडी करा, कारण यामुळे ओलावा बुरशी वाढवू शकते. नियमितपणे नखे कापा आणि स्वच्छ ठेवा, यामुळे संसर्ग टाळता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *