
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या चीन दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांची आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठ्या गोष्टींवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या दाैऱ्यावर जाताना म्हटले होते की, इराणच्या युद्धाचा बैठकीत अजेंडा नसेल. चीनची युद्ध थांबण्याकरिता आम्ही मदत घेणार नाहीत. मात्र, नुकताच पार पडलेल्या बैठकीत चीन आणि अमेरिका यांच्यात इराणच्या युद्धाबाबत चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच म्हटले की, शी जिनपिंग यांनी त्यांना सांगितले की, युद्ध संपवण्याकरिता चर्चा करण्यास (मध्यस्थी करण्यास) आणि होर्मुज खाडी पुन्हा सुरू करण्यासाठी चीन मदत करण्यास तयार आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता चीनची मदत मागितली होती. मात्र, चीनने मदत करण्यास नकार दिला. आता चीनची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांना होर्मुज खाडी सुरू होताना बघायचे आहे. शी जिनपिंग यांनी मला म्हटले की, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर सांगा मी करू शकतो. मला मदत करायची आहे. चीन हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे.
चीनला इराणकडून तेल खरेदी करण्याकरिता अमेरिकेने परवानगी दिली, त्यांच्यात काही मुद्द्यांमध्ये चर्चा झाली आणि मार्गही निघाली आहेत. इराणकडून चीन तेल खरेदी करणार आहे. मात्र, चीन इराणला शस्त्र देणार नाही. या दोन मुद्द्यांवर चीन आणि अमेरिका सहमत झाले. इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये परमाणु देऊ शकत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
चीन आणि अमेरिका यांच्यात होर्मुज खाडीबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांनी मान्य केले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली असणे आवश्यक आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग संकटात आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात अनेक मुद्द्यात सहमत होताना दिसत आहे.