
दरम्यान, शोमध्ये होस्ट आदित्य नारायण यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, एका रेकॉर्डिंगदरम्यान मधुबाला इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहून स्वतः आशा भोसले काही क्षणांसाठी गाणेच विसरल्या होत्या. आदित्य नारायण यांनी विनोदी अंदाजात म्हटले की, आशा भोसले मधुबालांकडे सतत पाहत राहिल्या आणि त्या जर पुरुष असत्या तर कदाचित मधुबालांच्या प्रेमातच पडल्या असत्या असं ते म्हणाले.