Headlines

अमेरिकेत मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याचा विचारही केला नाही तेच घडले, थेट..

अमेरिकेत मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याचा विचारही केला नाही तेच घडले, थेट..
अमेरिकेत मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याचा विचारही केला नाही तेच घडले, थेट..


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांचे तोंडभरून काैतुक केले. यासोबतच त्यांनी रशियासोबतच्या संबंधांचे काैतुकही केले. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून शी जिनपिंग यांनी पुतिन यांना थेट अराजकतेच्या काळात शांततेची शक्ती म्हटले. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना युक्रेनकडून काही गंभीर आरोप सातत्याने रशियावर केले जात आहेत. यादरम्यानच चीनने पुतिन यांचे काैतुक केले. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून हे भाष्य करण्यात आले. शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आयोजित केलेल्या ऐतिहासिक अमेरिका चीन शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतरच ही बैठक घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष चीन दाैऱ्यावर होते. त्यानंतर पुतिन देखील चीन दाैऱ्यावर पोहोचले आहेत. हा अमेरिकेला मोठा धक्का म्हणावा लागेल. युक्रेनसोबतच्या युद्धात अमेरिकेचा रशियावर मोठा दबाव आहे. त्यांच्या तेलावर अनेक निर्बंध घातली.

शी जिनपिंग यांनी सध्याच्या घडीला बिघडत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य केले. शी जिनपिंग यांनी नाव न घेता अमेरिकेवर जोरदार टीका केली. ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे शी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात बैठक झाली. शी जिनपिंग यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. एका वेगळ्या स्थितीत सर्व गोष्टी आहेत. चीन हा गुंतागुंतीच्या बदलाच्या काळातून जात आहे.

दुसरीकडे एकतर्फी वर्चस्ववादी प्रवृत्ती अनियंत्रितपणे वाढत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीका करण्यासाठी बीजिंगची वैशिष्ट्यपूर्ण भाषा वापरली. धोरण चीनला अन्यायकारक वाटते, असेही त्यांनी यादरम्यान त्यांनी बोलून दाखवले. चीन आणि रशियाने आपला व्यापक सामरिक समन्वय अधिक मजबूत केला पाहिजे.

रशियाकडून सातत्याने भारत चीन यांच्यातील संबंध मजबूत करण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. दोन्ही देशांना एकाच मंचावर आणण्यात त्यांना यापूर्वी यश मिळाले. आता पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात दोन्ही देश एकाच मंचावर येणार असल्याचे सांगितले जाते. भारत, चीन आणि अमेरिका एकाच मंचावर येत असल्याने अमेरिकेची मोठी डोकेदुखी वाढलीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *