
‘या’ काळ्या बियांच्या पेस्टचे करा सेवनImage Credit source: Instagram
चाळीशीनंतर बहुतेक महिलांना अशक्तपणा आणि हाडांमध्ये वेदना यांसारख्या समस्या जाणवू लागतात. कारण प्री-मेनोपॉजच्या फेज आणि मेनोपॉजच्या फेजमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या निर्माण होतात. अशावेळेस अनेक महिला या महागड्या सप्लिमेंट्स किंवा औषधांवर पैसे खर्च करतात. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशावेळेस चाळीशीनंतर आपल्या आहारात बदल करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. असे पदार्थ खा जे तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढतील आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतील. यामुळे तुमचे एकूण आरोग्य सुधारते आणि त्वचा व केस निरोगी राहण्यास मदत होते.
आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. काण प्रत्येक व्यक्तीने याला प्राधान्य दिले पाहिजे, कारण जर तुम्ही स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवले नाही, तर तुम्ही इतर गोष्टी योग्यरित्या हाताळू शकत नाही. महिला घरात आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे, स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशातच वाढत्या वयानुसार महिलांसाठी मजबूत हाडे, निरोगी केस आणि त्वचेसाठी काळ्या बियांची ही पेस्ट उत्तम आहे. चला तर मग, या जादुई पेस्ट कशी बनवायची तसेच सेवन आणि फायदे याबद्दल जाणून घेऊयात.
आरोग्यदायी पेस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तुम्हाला 4 मोठे चमचे काळे कलोंजीचे दाणे, 3 मोठे चमचे काळे तीळ, 100 ग्रॅम मध लागेल.
ही पेस्ट कशी बनवायची?
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये कलोंजी चांगली भाजून घ्या. मंद आचेवर भाजताना ती जळू नये म्हणून सतत ढवळत राहा.
कलोंजीप्रमाणे काळे तीळ मंद आचेवर सतत ढवळत भाजून घ्या. - जेव्हा दोन्ही गोष्टी भाजून होतील, तेव्हा त्यांना एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर ग्राइंडरमध्ये टाकून त्याची पूड करा.
- आता या पावडरमध्ये मध मिक्स करून चमच्याने चांगले मिक्स करा. तयार मिश्रण हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
- तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवू शकता, म्हणजे ते सुमारे 3 महिने खराब होणार नाही.
ही पेस्ट कशी खावी
तुम्ही या मिश्रणाचे 1 चमचा दररोज सेवन करू शकता. जर तुम्ही हे मिश्रण नियमितपणे सेवन करण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला काही दिवसांतच लक्षणीय बदल दिसून येतील, जसे की ऊर्जेत वाढ. ही जादुई पेस्ट अनेक पॉवरफूल पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, जी कालांतराने तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहेत.
फायदे आणि पोषक तत्वे
पोषणतज्ञ सांगतात की, कलोंजी, मध आणि काळ्या तिळाचे हे मिश्रण कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध आहे. हे तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. यामध्ये चांगले फॅट्स देखील आहेत, जे तुमच्या सांध्यांसाठी फायदेशीर ठरतात आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ही पेस्ट तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवून वारंवार होणारे आजार टाळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)