Headlines

थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकरला इस्लाम, आता नावही बदलणार; म्हणाला मी…

थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकरला इस्लाम, आता नावही बदलणार; म्हणाला मी…
थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकरला इस्लाम, आता नावही बदलणार; म्हणाला मी…


Actor Thalapathy Vijay : सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. चित्रपटसृष्टीत काम करणारे नट अनेकदा प्रेमात पडतात. विशेष म्हणजे काही कलाकारांचे तर दोन, तीन लग्न झालेले आहेत. काही कलाकारांनी धर्मांतर केलेल्याचेही समोर आलेले आहे. विशेष म्हणजे काही अभिनेते, अभिनेत्री राजकारणातही चांगलेच सक्रिय आहेत. काही कलाकार हे आमदार आहेत तर काही कलकार खासदार म्हणून काम करत आहेत. तामिळनाडूत तर अभिनेता असलेल्या थलापती विजय यांनी थेट विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. थलापती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. आता याच थलापती विजय यांच्या सहकलाकाराविषयी मोठी माहिती समोर आली आहे. कधीकाळी विजय यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या कलाकाराने थेट मुस्लीम धर्म स्वीकारला आहे.

2011 सालापासून मुस्लीम धर्माचे पालन

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलापती विजय यांच्यासोबत कधीकाळी चित्रपटात काम केलेल्या जय उर्फ जय संपत याच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जय संपत याने मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. विशेष म्हणजे जय हा 2011 सालापासूनच मुस्लीम धर्माच्या रितीरिवाजाचे पालन करत आहे. मी लवकरच माझे नावदेखील बदलणार आहे, असे त्याने सांगितले आहे.

जय याने मुलाखतीत सांगितली माहिती

थलापती विजय आणि जय यांनी बगावती या चित्रपटात सोबत काम केले होते. जय याने विजय यांच्या भावाची भूमिका साकारली होती. जय याचे सिनेसृष्टीतील करिअर खूप मोठे असेल असे बोलले जात होते. परंतु जयला म्हणावा तसा सूर गवसला नाही. जय याने ‘गलाटा प्लस’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जय याने त्याने धर्म बदलल्याचे सांगितले. ‘मी मशिदीत गेलो होतो. मी एक अभिनेता आहे, याची सर्वांनाच कल्पना होती. परंतु मशिदीत माझ्याशी कोणीही बोलले नाही. माझ्यासोबत कोणीही फोटो काढला नाही. मशिदीतून बाहेर आल्यावर मात्र सर्वांनी माझ्याशी गप्पा केल्या. मुस्लीम धर्मात मशिदीत ते अल्लाहलाच सर्वोच्च मानतात. तिथे कोणीही सेलिब्रिटी नसतो. तेव्हापासून माझा स्वभाव खूप बददला,’ असे जयने या मुलाखतीत सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *