Headlines

Nagpur | महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ

Nagpur |  महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
Nagpur |  महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ


महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नागपुरात जोरदार आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरातील सिग्नलजवळ निदर्शने केली. वाढती महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. राज्यातील वाढती महागाई, रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पुढील काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *