Headlines

शेतकरी कर्जमाफीचा जीआर कधी हवा? बड्या नेत्याने थेटच सांगितलं, मोठी अपडेट समोर

शेतकरी कर्जमाफीचा जीआर कधी हवा? बड्या नेत्याने थेटच सांगितलं, मोठी अपडेट समोर
शेतकरी कर्जमाफीचा जीआर कधी हवा? बड्या नेत्याने थेटच सांगितलं, मोठी अपडेट समोर


राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरड मोडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली होती. या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सामील झाले होते. उपराजधानी नागपूरमध्ये हजारो शेतकरी एकत्र जमले होते. त्यानंतर सरकारने जून 2026 मध्ये कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. अशातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले आहे. कडू यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफीवर भाष्य

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ‘कर्जमाफीला आचारसंहितेतून सूट देण्याची गरज नाही, कारण की याची घोषणा आधीच झालेली होती. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी 31 मे कर्जमाफीचा जीआर निघायला पाहिजे आणि तो निघेल. ही कर्जमाफी योजना सुद्धा त्यांच्याच नावाने आहे. सरकारने देखील 31 मे लाच हा शासन निर्णय काढला पाहिजे.’ आता सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा

बच्चू कडू यांनी आजच्या नाशिकच्या चांदवडमधील शेतकऱ्यांच्या मोर्चावर बोलताना म्हटले की, ‘कांदा खरेदीचा निर्णय हा चांगला असला तरी तो परिपूर्ण नाही. लागलेला खर्च निघत नसल्याने राज्य सरकारने त्यांना प्रोत्साहन निधी दिला पाहिजे. विरोधकांनी कांदयासाठी आंदोलन केलं त्यांचा स्वागत आहे. मात्र काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले. सत्तेच्या बाहेर असल्यावर शेतकरी आठवायचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये, तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे.’

मुख्यमंत्री फडणवीसांनीही दिले कर्जमाफीचे संकेत

राज्यातील फडणवीस सरकारने जून महिन्यात कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले होते की, ‘कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *