Headlines

पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं

पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं


पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत संशयित विषारी दारू प्रकरणात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हादरला असून प्रशासन सतर्क झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारू सेवन केल्यानंतर संबंधितांना तोंडातून फेस येणे, चक्कर येणे, अचानक बेशुद्ध पडणे अशी गंभीर लक्षणं दिसून आली. काही जण बाथरूममध्ये पडल्याने तर काहींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तरुणांसह वृद्धांचाही समावेश असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांपैकी 6 जण पिंपरी-चिंचवड परिसरातील तर 5 जण हडपसर भागातील आहेत. उर्वरित चार मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात कारवाई करत योगेश वानखेडे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *