Headlines

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी भुजबळांनी लावले ‘बळ’; पुतण्यासाठी पण मोठी फिल्डिंग, राजकारणातील मोठी घडामोड…

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी भुजबळांनी लावले ‘बळ’; पुतण्यासाठी पण मोठी फिल्डिंग, राजकारणातील मोठी घडामोड…
Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी भुजबळांनी लावले ‘बळ’; पुतण्यासाठी पण मोठी फिल्डिंग, राजकारणातील मोठी घडामोड…


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Chhagan Bhujbal on Rajya Sabha: राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भुजबळांनी एका जागेसाठी बळ लावल्याचा दावा करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही याबाबत संभ्रम असतानाच अजून एक अपडेट समोर येत आहे. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक पण पुतण्याला मंत्रीपद देण्याची भुजबळांची मागणी असल्याचाही दावा करण्यात येत आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना पक्ष आता तरी केंद्रात स्थान देणार का असा प्रश्न आहे.

पुतण्यासाठी भुजबळ आग्रही

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी आता राष्ट्रवादीतून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा अद्याप प्रकट केली नसली तरी पडद्याआडून त्यांनी सूत्र हलवल्याचा दावा करण्यात येत आहे. तर पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे यासाठी भुजबळ आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मग घराणेशाहीचे सूत्र इतरांना लागू का नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर सुनेत्रा पवार यांच्या हातात पक्षाची सूत्र गेली. त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षातील कार्यकारिणीत मोठे स्थान मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलगी महिला खात्याची मंत्री आहे. तर इतर काही नेत्यांची मुलंही राजकारणात प्रभावी काम करत आहेत. मग पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिपद मागितले तर चुकले कुठे असे भुजबळ समर्थकांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर घराणेशाहीचा आरोप असेल तर इतर नेत्यांना जे सूत्र आहे, तेच सर्वांना का लागू असू नये असे म्हटल्या जात आहे.

तर आता राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कुणाला राज्यसभेचे तिकीट देणार याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना डावलणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *