Headlines

पुतिन यांना १५० वर्षे जगवायचंय… रशिया खर्च करतोय तब्बल २५०० अब्ज रुपये

पुतिन यांना १५० वर्षे जगवायचंय… रशिया खर्च करतोय तब्बल २५०० अब्ज रुपये
पुतिन यांना १५० वर्षे जगवायचंय… रशिया खर्च करतोय तब्बल २५०० अब्ज रुपये


सप्टेंबर २०२५ मध्ये बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एका लीक ऑडिओनंतर मानवाचे आयुर्मान वाढवण्यावर जगभरात चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे मानवाचे आयुर्मान वाढवण्यावर असा काही प्रयोग सुरु आहे का असा सवाल केला जात होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यावर चर्चा करत आहेत की मानवाचे वय १५० वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. या नंतर ही देखील चर्चा सुरु झाली की पुतिन आणि जिनपिंग स्वत: १५० वर्षांपर्यंत जगू इच्छीत आहेत का ?

आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिन येथून नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे कार्यालय आयुर्मान वाढवण्याच्या कार्यपद्धती आणि उपायांवर संशोधन करत आहे. या संशोधनावर २६ अब्ज डॉलर ( २,५०० अब्ज रुपये ) खर्च करण्याची तयारी आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने याची बातमी दिली आहे.

या बातमीनुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन या वैज्ञानिक प्रकल्पाची स्वत: देखरेख करत आहे. तर प्रोजेक्टचे नेतृत्व पुतिन यांची कन्या मारिया वोरोंत्सोवा (एंडोक्रिनोलॉजिस्ट) आणि रशियाचे कुरचातोव इन्स्टिट्यूटचे प्रमुख मिखाईल कोवॅल्चुक करत आहेत.

रशियात कोणत्या प्रकारची तयारी सुरु ?

२०२४ मध्ये रशियाच्या संशोधकांनी या प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. याची सुरुवात अत्यंत संथ गतीने सुरु होती. मात्र, आता या प्रकल्पाने वेग पकडला आहे. प्रोजेक्टच्या अंतर्गत तीन प्रमुख कामे केली जात आहेत.

1. जीन ( गुणसूत्र ) थेरेपीद्वारे सेल्युलर एजेइंजची गती कमी करणे. प्रयत्न हाच आहे की या थेरपीद्वारे वृद्धत्व वाढवणाऱ्या गुणसूत्रांना संपवले जाणार आहे.

2. 3D बायोप्रिंटिंग प्रोसेसद्वारे खराब झालेल्या मानवी अवयवांना पुन्हा तयार करणे. पुतिन यांचे म्हणणे होते की जर अवयवांना बदलले तर आयुर्मान वाढवता येऊ शकते.

3. जीन-मॅच्ड छोट्या डुकरात मानवी अवयवांचा विकासाद्वारे या प्रयोगाला यशस्वी केले जात आहे.

रशियाच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की त्यांनी उंदराच्या थायरॉईड ग्लँड आणि मानव कार्टिलेज उतींच बायोप्रिंट केले आहेत. रशियांच्या संशोधकांना आशा आहे की ही प्रक्रिया साल २०३० पर्यंत पूर्ण होऊ शकते.

प्रोजेक्टला खूप गुप्त ठेवले जात आहे

आयुर्मान वाढवण्याच्या पद्धतींना शोधणाऱ्या या प्रोजेक्टला खूप सीक्रेट ठेवले आहे. ७३ वर्षांचे पुतीन याची स्वत: जातीने देखरेख करत आहेत. त्यांच्या जवळील संशोधकांनाच या प्रयोगासाठी निवडलेले आहे. रशिया वार्धक्याच्या समस्यांनी ग्रासलेला आहे. रशियन पुरुषांचे सरकारी आयुर्मान ६८ वर्षे आहे. जे युरोपातील अनेक देशांहून कमी आहे. युरोपातील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७८ वर्षे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *