Headlines

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश


काँग्रेसचा बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीची वाट धरली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी देखील महायुतीमध्ये प्रवेश केला.

दरम्यान आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसला आहे. अमरावतीमधून मोठी समोर आली आहे, ती म्हणजे   काँग्रेसचे सहकार नेते सुधाकर भारसाकडे हे आपल्या समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सुधाकर भारसाकडे यांच्यासह इतरही काही पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अमरावती जिल्ह्यात हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांच्यावर पक्ष विस्ताराची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे, दरम्यान बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आमरावतीमधून पहिला मोठा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटात होत आहे. सुधाकर भारसाकडे हे आपल्या समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *