Headlines

कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय?

कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय?
कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय?


कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 6 जून रोजी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. NEET परीक्षेतील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे. याच्या विरोधात आता दीपके यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना आणि विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये येऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अभिजीत दीपके यांनी काय म्हटले?

अभिजीत दीपके यांनी व्हिडिओ मध्ये भारतात परत येण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, NEET परीक्षा वाद आणि कथित पेपर लीक प्रकरणात आंदोलन करण्यासाठी मी भारतात येत आहे. अभिजीत दीपके यांनी म्हटले की, NEET परीक्षेशी संबंधित वादांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गोंधळासाठी जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे आणि कुणीतरी याची जबाबदारी घ्यायलाच हवी.

अभिजीत दीपके 6 जून रोजी दिल्लीत येणार

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, ‘मी 6 जून रोजी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागणार आहे. भारतीय संविधान नागरिकांना लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आपली बाजू मांडण्याचा अधिकार देते आणि आमचे आंदोलनही याच घटनात्मक अधिकारांतर्गत असेल.’ आपल्या संदेशात दीपके यांनी, समर्थक, विद्यार्थी आणि तरुणांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन आवाज उठवतील तर सरकारला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

दीपके यांना अटक होण्याची भीती

अभिजीत दीपके यांनी असेही सांगितले की, ‘माझ्या ओळखीतील काही लोक आणि कुटुंबीयांना भीती आहे की दिल्लीमध्ये पोहोचल्यावर मला ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र माझा भारतीय लोकशाही आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *