Headlines

Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात

Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित शिवसैनिक मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विखे-पाटील यांनी केलेल्या “उबाठा शिल्लक राहणार नाही” या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विखे लवकरच भिकेला लागणार, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय, राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेनेच मोठे केले असून त्यांनी पक्षनिष्ठेबाबत आम्हाला शिकवू नये. काँग्रेसने मोठं केलेल्या नेत्यांनी आता भाजपमध्ये जाऊन वेगळी भूमिका घेतल्याची टीकाही त्यांनी केली. “वाईट काळ प्रत्येकावर येतो. भविष्यात राजकीय परिस्थिती बदलली तर अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका करत शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना असल्याचा दावा केला. “आमची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पुढील अडीच ते तीन वर्षे काम करणार आहोत,” असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षबांधणीवर भर देण्याचे आवाहन केले. आगामी काळात संघटन मजबूत करून शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, त्यांच्या टीकेला विखे-पाटील किंवा सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *