Headlines

आता हातभट्टीला सरकारने थेट…पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची सर्वात मोठी मागणी!

आता हातभट्टीला सरकारने थेट…पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची सर्वात मोठी मागणी!
आता हातभट्टीला सरकारने थेट…पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची सर्वात मोठी मागणी!


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी तालुक्यातील बापगाव येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या पक्ष शाखेला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी पुण्यात विषारी दारू पिऊन झालेल्या मजूर कामगारांच्या मृत्यूबाबत खंत व्यक्त केली. हातावर पोट असलेला गरीब मजूर वर्ग स्वस्त असल्यामुळे हातभट्टीची दारू पितो. त्यामुळे हातभट्टीची दारू शासनमान्य आणि अधिकृत करण्यात यावी, असे वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केले.

शासन नियंत्रणाखाली हातभट्टीची दारू उपलब्ध झाल्यास विषारी दारूमुळे होणारे मृत्यू थांबतील, शासनाला महसूल मिळेल आणि गरीब मजूर वर्गाचे जीव वाचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विचारांबाबतही भूमिका मांडली. पक्ष शाखा सर्व समाजासाठी खुल्या असाव्यात. एका समाजापुरते मर्यादित राहून पक्ष मोठा होत नाही. सर्व समाजाला न्याय देत एकत्र घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *