Headlines

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…
जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…


OBC Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. ज्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता याच मागणीवर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 11 तारखेला आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्रचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. बोगस दाखले घेतलेल्यांना जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत, असा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे. जरांगेच्या भूमिकेचा विरोधात १२ तारखेला OBC नेते रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत प्रकाश शेंडगे यांनी भूमिका स्पष्ट केली.जारांगे यांनी आंदोलन केल्यावर सगळ्या गोष्टी मान्य केल्या जातात. पण जरांगे सरकारच्या गळ्यावर चाकू ठेऊन काम करत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून येतात. परंतु ते स्वतः मराठ्यांचे काम करत आहेत, असा आरोप शेंडगे यांनी केला. तसेच बावनकुळे यांनी अनेक ओबीसी दाखले हे मान्य केले आहेत. जात पडताळणीचे जे बोगस दाखले ह्यांनी घेतले आहेत. ते मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आंदोलन केले.  त्यामुले येत्या 12 जून रोज आम्ही राज्य व्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहोत, असेही शेंडगे म्हणाले.

त्याआधी आधी आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी आणि त्या ठिकाणी आमचं बोलण ऐकून घ्यावं. ज्या कुणबी नोंदी घेण्यात आल्या त्यावर अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या बायकाजपोरांनी जिल्हापरिषद, नगरपरिषद निवडणुका लढावल्या आहेत. त्यांच्या सगळे प्रमाणपत्र मान्य करून घेण्यासाठी हे सगळं चालू आहे.  आता ज्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवली आहे त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. कोणी सरकार कायम घेऊन राहत नसतं. आता जर आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळात ओबीसींचा डीएनए काय असतो ते दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला, त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *