Headlines

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना…मोठी अपडेट समोर!

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना…मोठी अपडेट समोर!
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना…मोठी अपडेट समोर!


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर नेमकी कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं ठरलं होतं. राज्यसभेच्या उमेदवाराचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं.

आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या मान्यवरांची बैठक पार पडली आहे. राज्यसभेच्या जागेच्या चर्चेसाठी छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यानंतर सर्व नेते छगन भुजबळ यांच्या घरी जमले होते. अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र या जागेसाठी नवनीत राणा आणि समीर भुजबळांच्या नावीचीही चर्चा होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *