Headlines

पोलीस येताच घामाघूम, बडा नेता साड्यांच्या गठड्यात लपला, ममता दीदींच्या नेत्यांवर भयानक वेळ, video तुफान व्हायरल

पोलीस येताच घामाघूम, बडा नेता साड्यांच्या गठड्यात लपला, ममता दीदींच्या नेत्यांवर भयानक वेळ, video तुफान व्हायरल
पोलीस येताच घामाघूम, बडा नेता साड्यांच्या गठड्यात लपला, ममता दीदींच्या नेत्यांवर भयानक वेळ, video तुफान व्हायरल


साड्यांच्या गठ्यात लपला टीएमसी नेताImage Credit source: एजन्सी

TMC leader Brahmanand Chakraborty Arrested: पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताच तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. टीएमसी नेते ब्रह्मानंद चक्रवर्ती यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधातील कारवाई व्हायल झाली आहे. हावडा जिल्ह्यातील उदयनारायणपूर परिसरात पोलिसांनी कारवाई केली. अटकेपासून वाचण्यासाठी मग चक्रवर्ती यांनी शक्कल लढवली. ते साड्यांच्या गठड्यामध्ये, गठ्यांमध्ये लपले. पण पोलिसांनी त्यांना शोधले आणि अटक केली. या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप कार्यकर्ते टीएमसी नेत्याच्या या लपंडावाच्या खेळावर तोंडसुख घेत आहेत. तर दुसरीकडे टीएमसीने सूडबुद्धीने कारवाईचा आरोप केला आहे.

घरातील साड्यांच्या गठ्यात लपले चक्रवर्ती

माध्यमातील वृत्तानुसार, ब्रह्मानंद चक्रवर्ती यांच्याविरोधात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंसाचाराचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात तपास सुरू आहे. तपास यंत्रणांना ते घरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांच्या घरात धडक दिली. पण अटकेपासून वाचण्यासाठी चक्रवर्ती यांनी घराच्या आताच साड्यांच्या ढीगाखाली, गठड्यामध्ये स्वतःला लपवले. एका खोलीत साड्यांचा हा ढीग पाहून पोलीस चक्रावले. त्यांचा संशय बळावला. त्यांनी शोध सुरू केला असता. साड्यांच्या गठड्यांमध्ये ते लपलेले आढळले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्यावरून राजकीय वाद उफाळला.

टीएमसी नेते जबाबदारी टाळत असल्याचा आरोप

या घटनेनंतर टीएमसी नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी टीएमसी नेते जबाबदारी टाळत असल्याचा आरोप करत आहेत. तपास यंत्रणांनापासून लपण्यासाठी टीएमसी नेत्याचा हा ड्रामा सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजप आणि टीएमसीमध्ये अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष उडाला आहे. राज्यातील विविध सरकारी कल्याणकारी योजना, विशेष गृह निर्माण योजना यावरून वातावरण तापले आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि कमिशन लाटल्याचा आरोप भाजप करत आहे. तर सध्या टीएमसी पक्षातही मोठ्या फुटीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात घमासान सुरू आहे. तर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाद भडकल्याचे व्हिडिओही समोर येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाल्याचेही समोर आले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *