Headlines

राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले…

राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले…
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले…


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली आणि ‘तुम्ही राजीनामा द्यावा’ अशी पक्षाची सूचना आहे, असं इद्रीस नायकवडी यांना सांगण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु इद्रीस नायकवडी यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मागितला नसल्याचा खुलासा त्यांनी केला, तेव्हा विविध चर्चांना पूर्णविराम लागला. इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत.

दरम्यान, इद्रीस नायकवडी यांनी नुकतीच सुनेत्रा पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला. यावर नायकवडी यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘पक्षाने माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा वगैरे मागितलेला नाही.’ भेटीबाबत बोलताना नायकवडी म्हणाले, ‘मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यक्रम वगैरे मी राबवत असतो. कोणताही कार्यक्रम असेल तर पक्ष सगळ्यांना जबाबदारी वाटून देतो. आता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे,’ असं त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *