
भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 3 डावांत 150 धावा केल्या आहेत. रोहित अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजआधी फिटनेस टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे रोहितच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)
रोहितनंतर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद शहजाद विराजमान आहे. शहजाद याने 2 डावांत 146 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)
अफगाणिस्तानाचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानी आहे. नबीने 4 डावांत टीम इंडिया विरुद्ध 141 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)
टीम इंडियाचा विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराटने 2 डावांत 122 धावा केल्या आहेत. विराटला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. (Photo Credit : PTI)
हशमतुल्लाह शाहिदी पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. शाहीदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध 3 डावांत 101 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याच्याकडे विराटला अफगाणिस्तान विरुद्ध वनडे धावांबाबत मागे टाकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. केएलने 2 डावांत 90 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)