Headlines

इराणचा अमेरिकेला दणका, बहरीनमधील बड्या नौदल तळावर हल्ल्याचा दावा; युद्ध आणखी पेटणार?

इराणचा अमेरिकेला दणका,  बहरीनमधील बड्या नौदल तळावर हल्ल्याचा दावा; युद्ध आणखी पेटणार?
इराणचा अमेरिकेला दणका,  बहरीनमधील बड्या नौदल तळावर हल्ल्याचा दावा; युद्ध आणखी पेटणार?


इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आणखी तीव्र होताना पहायला मिळत आहे. अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केल्यानंतर इराणने आता बहरीनची राजधानी मनामा येथील जुफैर परिसरात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लीट तळावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांमध्ये या तळाचा समावेश असल्याने हा हल्ला अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फिफ्थ फ्लीट काय आहे?

अमेरिकन नौदलाची फिफ्थ फ्लीट 1995 मध्ये पुन्हा सक्रिय करण्यात आली होती. तिचे मुख्यालय बहरीनमधील नेव्हल सपोर्ट अ‍ॅक्टिव्हिटी येथे आहे. ही फ्लीट सुमारे 25 लाख चौरस मैल (सुमारे 65 लाख चौरस किलोमीटर) समुद्री क्षेत्रावर नजर ठेवते. यामध्ये पर्शियन आखात, लाल समुद्र, ओमानचा आखात, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील काही भागांचा समावेश होतो. हा परिसर जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जगातील सुमारे 20 ते 25 टक्के तेलवाहतूक याच भागातून होते. फिफ्थ फ्लीटचे प्रमुख काम म्हणजे समुद्री मार्गांची सुरक्षा, आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांचे संरक्षण, समुद्री चाचेगिरी रोखणे आणि प्रादेशिक स्थैर्य राखणे हे आहे.

फिफ्थ फ्लीटची ताकद किती?

फिफ्थ फ्लीटमध्ये सुमारे 8,000 ते 15,000 नौसैनिक तैनात आहेत. तसेच विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, फ्रिगेट्स, पाणबुड्या, मायन स्वीपर्स, लॉजिस्टिक जहाजे आणि ड्रोनचा समावेश आहे. या फ्लीटता 40 हून अधिक देशांच्या सागरी सुरक्षा आघाडीसोबत समन्वय आहे. यामुळे याच फ्लीटवर हल्ला होणे अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे.

इराणचा थेट इशारा

जागतिक अभ्यासकांच्या मते फिफ्थ फ्लीटच्या मुख्यालयाला लक्ष्य करून इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या उपस्थितीला थेट आव्हान दिले आहे. हा हल्ला केवळ लष्करी तळावरचा हल्ला नसून जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात, जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो आणि प्रादेशिक सुरक्षेचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *