Headlines

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 46 दिवस असेल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून सुरूवात होणार

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 46 दिवस असेल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून सुरूवात होणार
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 46 दिवस असेल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून सुरूवात होणार


वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 46 दिवस असेल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून सुरूवात होणारImage Credit source: TV9 Network/File

2027 men’s ODI World Cup Schedule: आयसीसी स्पर्धा आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 ला होणार आहे. चार वर्षानंतर ही स्पर्धा होणार असल्याने उत्सुकता आहे. मागच्या पर्वात टीम इंडियाच्या पदरी अंतिम फेरीत निराशा पडली होती. आता टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशात आहे. असं असताना या स्पर्धेबाबत एक अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या स्पर्धाला 4 ऑक्टोबर 2027 पासून सुरूवात होईल. तसेच अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी असेल, असं सांगण्यात येत आहे. जवळपास दीड महिना ही स्पर्धा चालेल आणि एकूण 54 सामने खेळले जातील. या स्पर्धेत जेतेपदासाठी एकूण 14 संघ उतरणार आहेत.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा फॉर्मेट ठरला!

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा मागच्या पर्वाच्या तुलनेत थोडी वेगळी असणार आहे. आयसीसीने 2003चा फॉर्मेटचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 14 संघ भाग घेणार असून त्यांचं 7-7 असं दोन गटात विभागणी केली जाणार आहे. प्रत्येक गटातील टॉप 3 संघांना सुपर 6 फेरीत एन्ट्री मिळेल. यातून टॉप 4 मध्ये असलेल्या संघांना उपांत्य फेरीत जागा मिळेल. त्यामुळे सुपर 6 फेरीतही चुरस असणार आहे. गुणांसोबत नेट रनरेटचा गणितही संघांना राखावं लागेल. पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ उपांत्य फेरीत भिडतील.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं मुख्य यजमानपद हे दक्षिण अफ्रिकेकडे असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वाधिक सामने आणि बाद फेरीचे सामने दक्षिण अफ्रिकेत होतील अशी सूत्रांची माहिती आहे. दक्षिण अफ्रिकेतील 8 स्टेडियममध्ये सामने होती. त्यात जोहान्सबर्गच्या वांडरर्स, केपटाउनच्या न्यूलँड्स आणि डरबनच्या किंग्समीड स्टेडियमचा समावेश आहे. झिम्बाब्वेच्या हरारे आणि बुलावायोत सामने होतील. तर नामिबियात पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेा होार आहे. या ठिकाणची दोन मैदानं निश्चित करण्यात आली आहेत.

या 14 संघांना मिळणार एन्ट्री!

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत आयसीसी क्रमवारीतील टॉप 8 संघांना थेट एन्ट्री मिळणार आहे. तर दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वेकडे यजमानपद असल्याने त्यांना थेट तिकीट मिळालं आहे. पण नामिबियाकडे यजमानपद असूनही त्यांना स्पर्धेत जागा पक्की करण्यासाठी पात्रता फेरी पास करावी लागणार आहे. तर उर्वरित तीन चार जागांसाठी पात्रता फेरीत चुरस पाहायला मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *