Headlines

आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व

आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व
आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व


जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा केवळ एक व्यायाम नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आजच्या वेगवान जीवनात आणि वाढत्या तणावामध्ये योगा करण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण योगा केल्याने आपल्यातील केवळ तणाव कमी होत नाही, तर शरीर तंदुरुस्त आणि मन शांत ठेवण्यासही मदत होते.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी एका विशिष्ट थीमवर हा दिवस साजरा केला जातो. चला तर मग या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊयात.

योग दिन 2026 ची थीम काय आहे?

या वर्षी म्हणजेच 2026 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम “Yoga for Healthy Ageing” ही आहे.

या थीमचा अर्थ अगदी सोपा आहे, योगाच्या माध्यमातून आपण केवळ दीर्घायुष्यच नव्हे, तर निरोगी आणि सुदृढ जीवनही जगू शकतो.

हा विषय दीर्घायुष्यावर तसेच निरोगी राहण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर भर देतो, म्हणजेच आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत निरोगी आणि तंदुरुस्त राहिले पाहिजे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात 2014 मध्ये झाली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत 21 जून रोजी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला . संयुक्त राष्ट्रांनी त्याच वर्षी डिसेंबरमध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली. पहिला योग दिन 21 जून 2015 रोजी जगभरातील लाखो लोकांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी योगाभ्यास, चर्चासत्रे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्या सर्वांचा उद्देश लोकांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा असतो.

तसेच सरकारी कार्यालयात, शाळांमध्ये, इतर ऑफिसांमध्येही आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

योगाचा स्वीकार करा, निरोगी जीवन जगा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमचे शरीर निरोगी राहो, तुमचे मन शांत राहो आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो. योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

योगामुळे आपल्याला आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते, तुम्हा सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दररोज योगासाठी काही मिनिटे काढा आणि आपले जीवन समृद्ध करा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

योगाशी जोडून घ्या, आरोग्याशी जोडून घ्या आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करा. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *