Headlines

Government Scheme : महिलांसाठी गुड न्यूज… सरकार घेणार मोठा निर्णय; आज थेट मुख्यमंत्र्यांसमोरच विधेयक

Government Scheme : महिलांसाठी गुड न्यूज… सरकार घेणार मोठा निर्णय; आज थेट मुख्यमंत्र्यांसमोरच विधेयक
Government Scheme : महिलांसाठी गुड न्यूज… सरकार घेणार मोठा निर्णय; आज थेट मुख्यमंत्र्यांसमोरच विधेयक


महिला शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

Women Farmers Bill: महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार एक नवीन विधेयक आणणार आहे. यंदाच्या अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता आहे. महिला शेतकर्‍यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज विधेयकाचे सादरीकरण होणार आहे. वर्षा निवासस्थानी आगामी विधेयकासंदर्भात आज सादरीकरण करण्यात येणार आहे. तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजिका होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

पावसाळी अधिवेशनात विधेयक?

राज्याच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पावसाळी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करण्यात येणार आहे. केंद्राच्या धरतीवर राज्यातही जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांचे कृषी प्रश्न सोडविण्यास मदत होईल. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नवीन कायदा आणण्यात येणार आहे.

काय काय होणार फायदा?

७/१२ वर महिलांचे नाव आणण्यासाठी प्रयत्न करणार

शेतातील सांख्यिकी आकडेवारीमध्ये स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात येईल

नमो ड्रोन दीदी योजनेतंर्गत ड्रोन पायलटचे प्रशिक्षण

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल

कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये महिलांना किमान ३० टक्के लाभ देण्यात येईल

पीएम किसान योजनेचा १८ लाख महिलांना लाभ मिळत आहे

‘लखपती दीदी’ आणि ‘शी मार्ट्स’ या माध्यमातून महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार

पशूपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालनासाठी विशेष अनुदान देण्याचा विचार

शेतकरी महिला होतील उद्योजिका

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्के मुली आहेत. आता महिला केवळ शेतकरी नाही तर कृषी उद्योजिका आणि तंत्रज्ञान वापरातही सरस ठरत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ड्रोन आणि इतर प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकरी महिलांना उद्योजिका करण्याचे काम करण्यात येईल.

महिलांना शेतकरी म्हणून ओळख निर्माण करणार

शेतकरी महिलांना सुलभ आणि सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख नाही. ती मिळवून देण्याचा प्रयत्न करण्या येईल. शेतीची व्याख्या व्यापक होईल. पशुपालन, वनशेती, मत्स्यपालन यांचाही समावेश शेतीच्या परिघात करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *