Headlines

मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर

मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर


सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी रोहित तपवार आंदोन करत असलेल्या ठिकाणी रोहित पवारांच्य पत्नी कुंती त्यांच्या भगिनी आणि त्यांच्या मोतोश्री दाखल झाल्या आहेत. यावेळी रोहित पवारांची अवस्था पाहुन त्यांच्या पत्नला अश्रू अनावर झाले आहे.

रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. ते जळगावहुन रवाना झाले आहेत आणि लवकरच रोहित पवारांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढे रोहित पवार म्हणालेत, जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.

याआधी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे आंदोलन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. कृषिमंत्री यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे आंदोलन गेले आहे. मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चा केल्या आहेत. मुख्यमंत्री तहसीलदारांना सांगूनही संपर्क साधू शकतात. पण ते बोलत नाहीत, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. संपूर्ण कर्जमाफी करावी. कर्जमाफीतील सर्व जाचक अटी मागे घ्याव्यात असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *