Headlines

उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…

उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गटाबाबत पत्र देऊ शकतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ही शक्यता खरी ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पक्षातील संभाव्य नाराजी थांबवण्यासाठी ठाकरे यांच्याकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवालय येथे दुपारी 4 वाजता ही बैठक होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *