Headlines

सोने खरेदी करू नका… फंड मॅनेजरची भविष्यवाणी खरी ठरली! आता पुढचं भाकीत काय? पैसा कमावण्याची दिली…

सोने खरेदी करू नका… फंड मॅनेजरची भविष्यवाणी खरी ठरली! आता पुढचं भाकीत काय? पैसा कमावण्याची दिली…
सोने खरेदी करू नका… फंड मॅनेजरची भविष्यवाणी खरी ठरली! आता पुढचं भाकीत काय? पैसा कमावण्याची दिली…


नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा सोन्याबाबतचे बाजारातील सेंटिमेंट खूपच खराब होते. त्यावेळी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे फिक्स्ड इनकम सीआयओ मनीष बांथिया यांनी बुलियन खरेदी करण्याचा जोरदार सल्ला दिला होता. त्यानंतर 29 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी चांदीचे भाव प्रचंड वाढणार असल्याची तंतोतंत भविष्यवाणी केली होती. त्यांचे हे दोन्ही अंदाज एकदम खरे ठरले. पण आता त्यांनी सोन्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनीष बांथिया यांनी हा सल्ला दिला आहे. सध्याची व्हॅल्यूएशन पाहता सोन्यात अतिरिक्त गुंतवणूक करण्यापासून वाचलं पाहिजे. 2.7 लाख कोटी रुपयांचे डेट एसेट्स सांभाळणाऱ्या मनीष यांच्या मते, इक्विटी, डेट आणि गोल्ड या तिन्हीमध्ये सोनं सध्या तरी कमी आकर्षक वाटत आहे.

सोन्याचं चक्र उलटलं?

गेल्या सहा महिन्यांपासून किमती धातूंवर अंडरवेट (कमी गुंतवणुकीचं धोरण) करण्यावर मनीष बांथिया यांनी भर दिला आहे. त्यांच्या मतानुसार, ज्या गोष्टी 2023मध्ये सोन्याच्या बाजूने होत्या, आता त्या पूर्णपणे पलटल्या आहेत. सोनं 2011पासून शांत होतं, सेंटिमेंट कमकुवत होतं, पण डी-डॉलरायजेशन आणि केंद्रीय बँकांची गुप्त खरेदी, जसं की मोठ्या मॅक्रो फॅक्टर्स जमीन तयार करत होत्या. तेव्हा लोकप्रियता कमी होती. आणि व्हॅल्यूएशन आकर्षक होतं. आता किंमती आपल्या ऐतिहासिक शिखरापासून 25 टक्क्याने खाली आल्या आहेत. बाजारात प्रमाणापेक्षा अधिक उत्साह वाढला आहे. आणि व्हॅल्यूएशन खूप महाग झाला आहे. सध्या सोन्यात जी तेजी आली आहे, ती केंद्रीय बँकांऐवजी ईटीएफच्या सट्टा प्रवाहाने दिली आहे. एकट्या भारताने या काळात वैश्विक चांदीच्या वाढत्या मागणीत 5 टक्क्यांचं योगदान दिलं आहे.

कुठे पैसा लावावा?

आज जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे 10 लाख रुपये असतील तर बांथियांच्या फ्रेमवर्कनुसार, गुंतवणूकदाराने सोन्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून इक्टविटी आणि टेड मार्केटच्या दरम्यान संतुलित विभागणी केली पाहिजे. त्यांच्या मते, डेट आकर्षक यील्ड प्रदान करत आहे. सोबतच इक्विटी दीर्घकाळापासून चांगला विकास करण्याची शक्यता आहे.

बांथिया म्हणाले की, 2024 मध्ये भारतीय शेअर बाजाराचे मूल्यांकन (Valuation) खूप महाग आणि जोखमीचे होते. मात्र, आता बाजारात चांगली घसरण झाल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आणि आकर्षक संधी निर्माण झाली आहे. बांथिया यांच्या मते, सध्या डेट मार्केट आकर्षक उत्पन्नदर (Yield) देत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला सुरक्षितता मिळण्याबरोबरच चांगला आणि निश्चित परतावा मिळण्याची क्षमता आहे.

( डिस्क्लेमर : या विश्लेषणातील सूचना या संबंधित विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या वैयक्तिक मतांवर आधारित आहेत; त्या टीव्ही9 मराठीच्या अधिकृत भूमिका किंवा मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण शेअर बाजारातील परिस्थिती अतिशय वेगाने बदलू शकते.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *